Technical Training Workshop December 2024

२३/२४ नोव्हेंबर, २०२४ रोजी चक्रम हायकर्स, मुलुंड तर्फे गिर्यारोहणातील काही तांत्रिक बाबींविषयी मूलभूत माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी एक मूलभूत तांत्रिक कार्यशाळा (बेसिक टेक्निकल वर्कशॉप) आयोजित करण्यात आली होती. अनुभवी आणि कुशल प्रस्तरारोहक श्री. शिरीष सहस्रबुद्धे आणि श्री. पुष्कराज आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. गिर्यारोहणातील सुरक्षा हा या दोघांचाही जिव्हाळ्याचा विषय आहे. MAC तर्फे आयोजित ‘ सेफ्टी की पाठशाला ‘ या प्रामुख्याने गिर्यारोहणातील सुरक्षेला समर्पित मालिकेच्या निर्मिती आणि यशात या दोघांचा महत्त्वाचा वाटा होता. अशा दोन तज्ञ गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाचा लाभ या कार्यशाळेत सहभागी झालेल्या जवळपास २५ जणांना निश्चितच झाला. 

सह्याद्रीतील मोहिमांचे नेतृत्व करताना किंवा भटकंती करताना किमान कोणती तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे, Belaying आणि anchoring करण्याच्या सुरक्षित आणि सोप्या पद्धती कोणत्या, कुठल्याही भटक्याला कोणत्या गाठी मारता आल्याच पाहिजेत अशा महत्त्वाच्या गाठी कोणत्या, दीड दिवस चाललेल्या या कार्यशाळेचा पूर्वार्ध २३ तारखेला म्हणजेच शनिवारी देशस्थ ऋग्वेदी संघाच्या मुलुंड पूर्वेकडील हॉलमध्ये पार पडला. यात सहभागींना आणीबाणी कशी ओळखावी, जोखीम (रिस्क) म्हणजे काय याबद्दल सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. ही माहिती देताना कुठल्याही मोहिमेच्या नेत्याला उपयोगी होतील अशा मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यातील काही खालीलप्रमाणे:

  1. जोखीमम्हणजे काय?
  2. नेता, प्रशिक्षक आणि तज्ज्ञ यातील फरक काय?
  3. सहभागींशी आपले संभाषण कसे असावे?
  4. कुठल्याही ट्रेकमध्ये येणाऱ्या अडचणी/धोके?
  5. Risk Domains
  6. संवेदनशील विषय कसे हाताळावेत?( लिंग, वंश, धर्म, शारीरिक ठेवणीची टिंगल इ.)

दुसरा दिवशी म्हणजेच २४ नोव्हेंबर (रविवारी) सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत ठाण्यातील टिकुजी नी वाडीच्या जवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन करण्यात आले. 

Anchoring आणि belaying करताना प्रामुख्याने ज्या गाठी बांधायला, लक्ष्य ठेवायला सोप्या अशा खालील गाठींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. 

  1. Clove Hitch around any object.
  2. Figure of 8 knot.
  3. Prusik hitch
  4. Tape knot / Water Knot
  5. Fisherman’s knot
  6. Bowline to self and others
  7. Alpine Butterfly

या गाठी मारायचे सोपे तंत्र कोणते? गाठ संपूर्णपणे सुरक्षित आहे हे कसे समजावे? कुठल्याही गाठीचे dressing का महत्त्वाचे आहे? गाठी मारताना कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या टाळाव्या कशा? आपण मारलेली गाठ दुसऱ्यांकडून तपासून घेणे का आवश्यक आहे? अशा विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 

त्यानंतर सुरक्षित नैसर्गिक साधनांचा उदा: झाड, मोठा खडक इ. वापर करून दोर कसा बांधवा, Anchor कसे निर्माण करावेत तांत्रिक उपकरणे आणि दोर वापरताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय निश्चित करू नये याचे अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. यात टेप स्लिंगचा वापर करून chest loop कसा करावा, belay देताना आपण कसे आणि कुठे उभे राहावे, बिलेचे नियंत्रण कसे करावे? दार थोड्या वेळाने belay आणि anchor तपासणे आवश्यक का असते याची कारण मीमांसाही करण्यात आली. 

दोर गुंडाळणे ही तशी खूपच कंटाळवाणी गोष्ट असते. दोर खूप लांब असेल तर फारच कंटाळा येतो. अशावेळी सोप्या आणि तितक्याच जलदगतीने दोराची गुंडाळी कशी करावी याचीही अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात आली. 

विविध गाठी, belay, anchoring या सर्वांची प्रात्यक्षिके दाखवताना प्रशिक्षकांनी प्रत्येक सहभागीकडे वैयक्तिक लक्ष दिले. कार्यक्रमाच्या शेवट प्रथमोपचाराची उजळणी घेण्यात आली. अशा शिबिरे वारंवार घेण्यात यावीत अशीच भावना सर्व सहभागींनी शेवटी बोलून दाखवली. 

अनिकेत रहाळकर

First Aid Training Course 2024

First Aid Course Organized by Chakram Hikers, Mulund

Friday, 20th September 2024 to Sunday, 22nd September 2024.

Faculty: Shantanu Pandit & Dhiren Talpade 

About Faculty:

Shantanu Pandit has experience in a) natural history, hiking, rock climbing & peak climbing, b) adventure tourism, outdoor education for children & youth and experiential learning for adults. As a ‘NOLS’ instructor he has taught outdoor leadership on courses in India and the U.S.A. Currently he teaches wilderness first aid as an instructor with ‘Aerie Backcountry Medicine’, U.S.A. (in association with Hanifl Centre for Outdoor education, Mussoorie). He also conducts courses on risk management for outdoor programmes through ATOAI. Dhiren Talpade has experience in adventure tourism, outdoor education for children and experiential learning for adults. Currently he teaches wilderness first aid as an instructor with ‘Aerie Backcountry Medicine’, U.S.A. (in association with Hanifl Centre for Outdoor education, Mussoorie) and runs his own outdoors based business.

Course content: 

Patient assessment & management of injuries & illnesses 

  • Flowchart for first aider includes 

– How to ensure site safety and decide actions 

– How to identify threats to life and act with immediate treatment 

– Full patient assessment including head-to-toe examination and patient history 

– Communicating & writing a first aid report 

  • Topics covered include but are not limited to: 

Life threats, significant topics like head, abdomen, spine, shock, wounds, fractures, asthma and allergies, environment related illnesses including acute mountain sickness, bites & stings and drowning, and patient moves & carries.

First Aid Training Course 2022

First Aid Course Organized by Chakram Hikers, Mulund

Friday, 11th November 2022 to Sunday, 13th November, 2022.

Faculty: Dr. Milind Chitley – A qualified Doctor by profession. He is one of the senior mountaineers in Maharashtra having more than thirty-five years of experience in various aspects of mountaineering. Dr. Chitaley was the climbing doctor of Kanchenjunga Expedition in 1988- the First Indian Civilian Expedition to any Himalayan peak above 8000 mtr. He has conducted numerous First Aid courses for the benefit of mountaineers in Maharashtra and is one of the leading experts on leadership in outdoors. He is also a former president of the highly esteemed Andheri Sports Club in Mumbai.

Course content: Dr. Milind Chitley has devised the course with a particular focus on the needs of mountaineers/trekkers. 

The course includes: 

  1. Hands-on experience for CPR with an adult mannequin. 
  2. Actual training for tying different bandages, slings and carries. 
  3. Evaluation of candidates by practical examination. 
  4. Various mountain sicknesses and their first aid. 
  5. Do’s and Don’ts of First aid. 

Besides this, the course has regular content like first aid in case of various accidents/emergencies in outdoors (snake bite, bee attacks, fractures, burns etc.)

Leadership Training Workshop 2002

First Aid Training Course - 2002