Poshichi Naal Climb – March 2022

Poshichi Naal
  • 15 March 2022
5 by 0 Reviews

Poshichi Naal Climb – March 2022

पोशी नाळ – एक शोध

सह्याद्रीच्या गगनभेदी कड्यांमधील असंख्य नाळा, घाट वाटा, या भटकंती करणाऱ्या सह्य भटक्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.
जीवधनच्या दक्षिणेला आणि सिद्धगडाच्या उत्तरेला असलेल्या वाटांपैकी त्रिगुण धार उर्फ तिरंगी घाट हा कोकणातील रामपूर ते घाटमाथ्यावरील डोनी या गावांना जोडणारा पूर्वापार चालत आलेला मार्ग.
त्रिगुण धार म्हणजे तीन नाळांचा समूह!पण यातील मधलीच वापरातील! वर डोनी गाव असल्याने त्याला डोनी दार असेही संबोधतात. उरलेल्या दोन नाळा जर वाटा नाहीत तर मग त्रिगुण धार का?
दरम्यान या तिन्ही नाळांचे नाव स्थानिक माणसांकडून माहिती झाले. खालून उत्तरेकडे असणारी पहिली पोशी नाळ किंवा पोशीची नाळ किंवा पोश्याची नाळ, मधली डोनी दार आणि तिसरी दक्षिणेची माडाची किंवा मधाची नाळ.
पोशी नाळेतून अजून कोणी गेलेच नाही. का? दोन्ही बाजूस गगनभेदी कडे, प्रचंड शिळा पडल्याने बंद झालेली वाट, काही जागी अतिशय चिंचोळी आणि अजिबात वापर नसणारी अशी ही वाट चढण्याचे कष्ट डोनी दार असताना कोण का घेईल.
चक्रम हायकर्सच्या प्रसाद आणि आशिष म्हात्रे यांनी पोशीची नाळ करण्याचे निश्चित केले. नाळेची कठीणता, त्यातील आव्हाने आणि ती पेलण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि तयारी पूर्ण करून संस्थेची पोशीची नाळ चढाई मोहीम आखण्यात आली.
प्रसाद म्हात्रे, आशिष म्हात्रे, सुदर्शन कानडे आणि राजेश पाटील असा तगडा तांत्रिक समूह आणि अनुभवी राजन महाजन, विनय जाधव अशी मुंबईकर मंडळी आणि सोबत विजय गुर्जर आणि तुषार कोठावदे असे पुणेकर. स्थानिक वाटाडे म्हणून या डोंगरात आयुष्य घालवलेले रामपूर गावातील तानाजी शळकंद मामा आणि वाघ वाडीतील बाबू वाघ मामा.
२५ मार्च रोजी रात्री साऱ्या तांत्रिक आणि आवश्यक सामानसह आम्ही सर्व तानाजी मामांच्या घरी रात्री उशिरा मुक्कामी पोहचलो. सकाळी चहा नाश्ता उरकून ७ वाजता सर्व उगवतीला आकाशात भिडलेल्या त्रिगुण धार मधील पोशीशी कडे कूच केली.वाटेत वाघ मामाना तयार केले.
सुरुवातीला डोनी दारची वाट आणि नंतर एकदम डावी चढाई. अगदी दाट जंगल! वाटेत जीव साखळीतील मोठ्या प्राण्यांचे अस्तित्वाचे अनेक पुरावे. नंतर नाळेत घुसून ३०० मीटर चढाई. मानवी हस्तक्षेप नसल्याने थोडी कारवी काटेरी झुडूपांमधून वाट काढत पुढे चाललेले वाघ मामा आणि मागून हळूहळू वर सरकणारे आम्ही. समोरच्या कड्या पर्यंत जाऊन मग वाट अगदी अडचणीची आणि ९० ते १२० अंशात उजवीकडे वळणारी. अखेर बाणासारखी गगनात घुसलेली निमुळती घळ आणि त्यात जागोजागी प्रचंड शिळा वाट अडवून बसलेल्या.
मोठ्या कष्टाने कसरत करत फक्त वाघ मामांच्या वाट काढण्याच्या कसबावर वर चढाई चालू झाली. झाडीचा झुडूपांचा टप्पा अंगावर येणाऱ्या उंचीसह मुख्य शिळा मार्गात जाण्याआधी साधारण १ वाजता एका कड्याला विसावलो.थोडी पोटपूजा आणि आराम करून मग सगळ्यांनी वजनदार पाठ पिशव्या उचलल्या.आता कातळ, तांत्रिक आरोहण आणि उंची. सोबतीला काळ्याकभिन्न कातळ भिंती.
नाळेत प्रवेश केल्यावर तांत्रिक कामं करावी लागली. आता तानाजी मामा पूर्वी ज्या शिळेपर्यंत येऊन परत फिरले तिथे पोहोचलो. इथून वर जाण्यासाठी काहीच मार्ग नव्हता. डाव्या बाजूला Tape Ladder लावून वरच्या बाजूस सोबत आणलेली तारेचं शिडी लावली आणि वर बिले देण्यासाठी एक बोल्ट मारला. हा टप्पा पार करेपर्यंत सव्वा चार वाजले. इथून नाळेचे तोंड फारच जवळ दिसत होते. मामांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तासाभरात नाळेच्या तोंडाशी पोहोचु असा अंदाज होता, जो पूर्णपणे फसला. जसजसे वर गेलो तसे अजून एक कठीण भाग लागला. इथे चार बोल्ट मारून वर आलो. खरंतर जाणे शक्य होते, पण एखादा होल्ड गंडला असता तर मात्र खैर नव्हती. काही टप्प्यांवर सुरक्षेसाठी दोराचा वापर करत, चिंचोळ्या चढाई मार्गातून सॅका वर देत, शेवटच्या टप्प्यात पोहचेपर्यंत ७ वाजले. अंधाराचे साम्राज्य सुरू झाले. पण शेवटचा टप्पा असा आला की इथून सॅक घेऊन जाणे धोकादायक होते. सॅकसकट माणूस जाणार नाही एवढी नाळ निमुळती झाली. प्रसाद वर गेला . त्याने आणि सुदर्शनने पुढचा मार्ग बघितला आणि निर्णय घेतला की २८० फुटाचा रोप वापरायचा. वरच्या बाजूला असलेला घसारा यामुळे वरील बाजूस झाडाच्या मुळया anchor म्हणून वापरुन वरुन तीन टप्प्यात दोर पास केला.
८ वाजता पहिला गडी माथ्यावर पोहोचला. दोर काढून आशीष आणि सुदर्शन ९ वाजता माथ्यावर पोहोचले आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. एक स्वप्न सुखरूप आणि सुरक्षित पूर्ण झाले.
माथ्यावर डोनी गावातील गवारी मंडळी भेटली. आम्ही पोशी नाळेने वर आलो याचे त्यांना फारच अप्रूप वाटले. त्यांच्या आग्रहामुळे डोनी गावातच मुक्काम केला. जरा जास्तच अंग मेहनत झाल्याने सकाळी डोनी दाराने न उतरता अहुपे घाटाने उतरून जीपने रामपूरला आलो. मामांचा आशीर्वाद घेऊन परतीचा प्रवास सुरु केला. पोशीची नाळ मोहीम ही त्यांच्याच आशीर्वादाचे आणि सहकार्याचे फलित होते.

Payment Info & FAQs

What you should carry?

Indicative Checklist of items to be carried (personal items not included): Do Not Forget to carry mandatory Items

  1. Extra cash, in case the expenses exceed Rs. 4500/- per head.
  2. Good quality sack to accommodate things required for the 4 Days trek – MANDATORY (you must also share a load of common equipment/material, if any, besides your luggage) (Avoid: 1-strap sack, handbags, suitcases, plastic bags etc.)
  3. Small backpack/Pittu (15-20 ltrs) required during the trek – MANDATORY
  4. Trekking Shoes that don’t slip on slippery surface (E.g. CTR/Action Trekking Shoes), Socks. MANDATORY
  5. Water bottle (min. 2 ltrs) – MANDATORY
  6. Additional pairs of clothes.
  7. Cap/Buff
  8. Chocolates / Titbits / Fruits/ chikki etc. as per choice
  9. Torch with extra cells – MANDATORY
  10. Personal Medicines, if any.
  11. Bedding (Sleeping bag/blanket/ Carry Mat/ Chaddar)
  12. Windcheater/ Poncho
  13. Trekking Pole
  14. Floaters/Sandals (for use only at camps)
  15. Power Bank

Clothing/ Footwear

Your clothing should be decent and sober. Avoid wearing jeans, shorts, sleeveless tops, tights and revealing clothes.

  • It is recommended to wear comfortable full-sleeve shirts and trousers/ trek pants. It helps to avoid mosquito & insect bites and scratches from thorny bushes along the route. The salwar kameez also works fine for ladies. Clothes made up of quick drying fabrics are useful for a trek in monsoon.

Note – half Pants/ Three-Forths are STRICTLY not allowed while trekking.

  • Any good trekking shoes (like Action/CTR Trekking shoes) that won’t slip on the slippery surface are recommended. For rainy season shoes with ankle support are particularly useful. Avoid ordinary canvass shoes or Hunter shoes (which have hard sole) as possibility of slipping with them is higher. It is advisable to wear the shoes which are one size higher to avoid blisters. Avoid torn/worn out shoes.

    Note – Participants without proper trekking shoes will not be allowed to continue for safety reasons and be sent back.

    IMPORTANT

    1. For reasons of safety, no participant will be allowed to trek without proper shoes and clothing.
    2. Avoid carrying excessive cash/gold ornaments.
    3. Please leave this trek brief & details of the trek with someone at home.
    4. Non-veg food & consumption of liquor is prohibited during the trek.
    5. This is a trek/nature trail & not a picnic and everyone is required to follow the rules & regulations of the club, applicable to every trek (reproduced at the end).
    6. Everybody is required to contribute in camping work like cleaning camp site, carrying equipment etc.
    7. Avoid photography/selfies at difficult spots. Ensure that you are not taking any risk while doing photography.
    8. This trek requires prior experience of trekking.

    Review Summary

    5/5
    Wonderful
    0 Verified Reviews
    Planning
    5
    Instructions / Guidance
    5
    Leadership
    5
    Overall Trek Experience
    5

    Write a Review

    5 Average Ratting
    Your email address will not be published.